मुंबई – मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. कधी कधी मी इथं लोकांना म्हणतो की, महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढा, तर तुमच्याकडे पैसाच राहणार नाही. तुम्ही जे मुंबईला आर्थिक राजधानी म्हणताय ती राजधानी राहणारच नाही असं राज्यपाल कोश्यारी असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहे. त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र प्रसिध्द केले आहे. त्यात त्यांनी कोश्यारींची होशियारी ? असे शिर्षक देऊन राज्यपालांना इशारा दिला आहे. बघा हे पत्र
"मराठी माणसाला डिवचू नका!" pic.twitter.com/0to6ByNyPk
— Raj Thackeray (@RajThackeray) July 30, 2022