मुंबई – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. या पत्रात त्यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा युती केली तर शिवसेनेला फायदा होईल असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीत असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत असल्याचे नमुद केले आहे. सरनाईक यांनी १० जून रोजी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले असून त्यात अनेक मुद्दे उपस्थितीत केल्यामुळे हा लेटरबाँम्ब सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. काय आहे या पत्रात सविस्तर वाचा…..

