नाशिक – मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक शहराजवळील विल्होळी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन वर्षाची मादी बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. बिबट्या रस्ता ओलांडत असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
दोन दिवसांपूर्वीच वनविभागाने विल्होळी येथून बिबट्याला जेरबंद केले होते. परंतु आता पुन्हा एकदा विल्होळी येथे बिबट्याने दर्शन दिल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळेस बिबट्या भक्ष्याच्या शोधातेवेळी विल्होळी येथे महामार्ग ओलांडत असताना हा अपघात झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला. ही तीन ते चार वर्षांची मादी बिबट्या असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. घटनेची माहिती विल्होळी येथील ग्रामस्थांनी पोलीस आणि वनविभागाला दिली. त्यानंतर हा प्रकार स्पष्ट झाला.