येवला – तालुक्यातील काही गावांत गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या धुमाकूळ घालत होता. त्याने अनेक जनावरांना लक्ष्य बनविले होते. अखेर हा बिबट्या आज सकाळच्या सुमारास साताळी परिसरात जेरबंद झाला आहे. याठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता. त्यात त्याला पकडण्यात यश आले आहे. ३ दिवसांपूर्वी हा बिबट्या महालखेडे येथे उसाच्या शेतात दिसला होता. त्यामुळे वनविभागाने साताळी येथे पिंजरा लावला होता. बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
बघा व्हिडिओ