विशेष प्रतिनिधी, पुणे
तंत्रज्ञानात अग्रेसर असलेली लिनोव्हो (Lenovo) कंपनीने आपला नवा ब्रँड लिनोव्हो गो (Lenovo Go) लाँच केला आहे. नव्या इक्सेसरीज बनविण्यासाठी कंपनीने हा नवा ब्रँड लाँच केला आहे. नव्या एक्सेसरीजद्वारे घरातून काम करण्याच्या आणि कार्यालयात काम करण्याच्या गॅपला भरून काढण्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात आला आहे. त्यासाठी कंपनीने Lenovo Go USB-C Laptop Power Bank आणि Lenovo Go Wireless Multi-Device Mouse ला लाँच केले आहे. कंपनीकडून लवकरच आणखी एक एक्सेसरीज लाँच केली जाणार आहे.
Lenovo च्या ग्लोबल SMB, व्हिज्युअल आणि एक्सेसरीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष एरिक यू म्हणाले, कंपनीतर्फे एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी २० टक्के छोट्या व्यावसाकांच्या कर्मचार्यांजवळ रिमोट मोडवर सोप्या पद्धतीने काम करण्याचे टेक टूल नाहीत. आजकालच्या रिमोट आणि हायब्रिड वर्क कल्चरमध्ये डाटा सुरक्षा आणि गोपनीय माहितीसाठी योग्य तंत्रज्ञान असणे आवश्यक आहे. यामुळे कर्मचार्यांच्या उत्पादन मूल्यात आणखी सुधार होण्याची शक्यता आहे.
दोन्ही डिव्हाइसची किंमत
लिनोव्हो या दोन्ही डिव्हाइसना या वर्षी जूनमध्ये लाँच करू शकते. या विशेष पावर बँकची किंमत ६५८९ रुपये आहे. तर माउसची किंमत ४३९२ रुपये आहे. लिनोव्होचा पुढील डिव्हाइस ऑडिओ स्वरूपात असू शकतो.
Lenovo Go USB-C Laptop Power Bank चे वैशिष्ट्ये
– लिनोव्होच्या विशेष लॅपटॉप पावरबँकमध्ये २०००० mAh क्षमतेची पोर्टेबल यूएसबी-सी बॅटरी उपलब्ध असेल
– ६५ W आउटपूट सोबत येणारा हा चार्जर बहुतांश सर्व लॅपटॉपना चार्ज करू शकतो.
– यामध्ये तुमचा लॅपटॉप यूएसबी -सी द्वारे चार्ज होतो.
– लॅपटॉपला पूर्ण चार्ज करण्यासाठी लिनोव्होने हा डिव्हाइस बनविला आहे.
– विशेष म्हणजे याद्वारे एकासोबत तीन डिव्हाइसना चार्ज करू शकतो.
– यादरम्यान यूएसबी टाइप -A पोर्टला फक्त १८ W आउटपूट मिळणार आहे.
– या डिव्हाइसचे एकूण वजन ३९० ग्रॅम आहे. त्यामुळे तो अगदी सहजपणे हाताळू शकतो.
Lenovo Go Wireless Multi-Device Mouse ची वैशिष्ट्ये
लिनोव्हो गो वायरलेस मल्टि डिव्हाइस माउसला तीन डिव्हाइसशी जोडला केले जाऊ शकतो. फक्त पुश बटनाच्या मदतीद्वारे स्विच करू शकतो. त्यासोबत एका वायरलेस डोंगल दिला जाणार आहे. त्याच्या मदतीद्वारे युजर्स लवकर जोडले जाऊ शकतात. त्याला यूएसबी टाइप सी शीसुद्धा जोडले जाऊ शकते.