दिनांक: १७ जुलै २०२१,
वार: शनिवार
वेळ: दुपारी साधारणतः २:००
स्थळ : हेड मास्तर नितीन छाजेड यांचे कार्यालय
साधारण ३१ वर्षांपूर्वी आम्ही सर्वजण पेठेच्या दहावीच्या क वर्गात शिकत होतो अन् पुन्हा आम्ही ५९ पैकी तब्बल ३२ पेक्षा जास्त वर्गमित्र पुन्हा एकत्रित आलो होतो तर १० ते १२ जण zoom वरून एकत्रित यायचं कारण होतं… ‘गेट टुगेदर पेठे १० क बॅच-१९९०” गेट टुगेदर साठी आलेल्या मित्रात, काही उत्तम शेतकरी होते तर काही जण उत्तम व्यापारी होते, काहीजण बांधकाम व्यावसायिक तर काही जण सरकारी काॅन्ट्रक्टर, तर कोणी कोर्टात नामवंत वकील होता तर कोण बॅंकेचा चेअरमन तर कोणी उच्च पदस्थ अधिकारी. तर काहींनी आपलं गाव सोडून मुंबई, पुणे, इत्यादी ठिकाणी आपल्या मेहनतीच्या बळावर एक उत्तम डॉक्टर म्हणून नावलौकिक मिळवलेला होता. तर काहीजण इंजिनिअर काॅलेजमध्ये आपापल्या विभागाचे प्रमुख होते, तर कोणी पत्रकारितेत नाव कमावलेलं, कोणी शिक्षक, तर कोणी इंजिनिअर, वकील, तलाठी, शेतकरी, शिक्षक, अधिकारी, व्यापारी, असे एक ना अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत मित्र. आजची ही मंडळी ३१ वर्षांपूर्वी एकाच वर्गात शिकत होते.
ही सगळी मंडळी आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत, नामवंत आहेत. आपल्या वाढत्या वयाबरोबर मिळवलेली प्रतिष्ठा अन् मोठेपणाचा रूबाब, हा या प्रत्येकांनी येताना वाटेतच सोडून दिला होता. आज राकेशचा राक्या तर शैलेशचा शैल्या, लक्ष्या, नित्या, मुन्नया झाला होता अशी कितीतरी जण गोळा झाली होती. ज्यात सुगंध, चुंनालाला, गणपत, मदन, संपत, सुजन अशी बापाच्या नावाने हाक मारायची परंपरा जोपासली गेली. किती तरी नावं होती. अशा नावानं आपल्या मित्राला हाक मारण्यातील मज्जा काही वेगळची असते.सकाळी नऊ वाजल्यापासून सर्व मित्रांचे फोन यायला लागले. अगदी शाळे असतांना वर्गामध्ये जसे भेटायचे तसेच अगदी तसेच येताच काही जणांच्या डोळ्यात पाणी होतं तर काही जण आपला मित्र दिसतात घट्ट मिठी मारून भावना व्यक्त करत होता.
आपली शाळा, शाळेतील वर्ग, वर्गातील तो बेंच की, ज्याच्यावर आपण बसत होतो, ते सगळं सगळं प्रत्येकजण आठवण व्यक्त करत होता, अन् भूतकाळात हरवून जात होता.त्यावेळेपासून सुरू झालेल्या गप्पा अन् गोंधळाने आजचा दिवस किती किती मजेशीर असणार आहे याची जाणीव करून दिली. यानंतर ज्यांना आम्ही गमावल आहे, अशा आमच्या काही गुरूजणांना व वर्गमित्रांना श्रद्धांजली वाहिली. यात आमचे तांबट सर, वि भा देशपांडे सर, तर *मित्रात विजय कुलकर्णी, श्रीरंग देवरे, श्रीराम दुसाने, नितीन खटोड, चेतन हंबरे यांना श्रद्धांजली वाहिली. हा प्रसंग डोळ्यांच्या कडा ओला करणारा अन् काळजाला हात घालणारा क्षण होता. ती मिनिटभराची शांतता सुध्दा अंगावर आल्यासारखी वाटली.
चह नाष्टा उरकल्यावर सर्व मित्रांचा परिचय सत्र झाले. कन्हैय्याने खास सुंदर अन् टवटवीत गुलाबांची फुले देऊन सर्व मित्रांचा सत्कार केला.
या सगळ्या धावपळीत नंतर सुध्दा आलेल्या मित्रांचा सत्काराचा अतिशय सुंदर कार्यक्रम झाला.जसं जसं सत्कारासाठी नाव घेतलं जात होतं तसं तसं राकेश प्रत्येकाच्या आठवणी सांगत होता. ‘प्रत्येकांनी आपापले नाव सांगून सध्या काय करतो ते सांगावं.’ यासाठी काही जण उस्फुर्तपणे अन् तेवढ्याच उत्साहाने आपली ओळख ही सांगितली. पण त्याच बरोबर शाळेतल्या सुध्दा काही आठवणींना उजाळा दिला. काहीजण अबोल आहेत तेव्हा त्यांना अक्षरशः ओढत व ढकलत आणलं अन् आपलं नाव सांगायला सांगितलं. (खरं तर यांना बायकोच्या नावाने उखाणे घ्यायला लावायला पाहिजे होते)
यात माझ्या लक्षात राहीला तो भावूक झालेला डॉक्टर कमलेश (बागमार). अन् दुसरा म्हणजे, ‘लग्नाला या,’ असं आमंत्रण देणारा संजय बोडके. कारण संज्या ने लग्नाचं आमंत्रण दिले तेव्हा बऱ्याच प्रश्न पडला की आता संज्याचे लग्न? तेवढ्यात तो लगेच पुढे म्हणाला, “२९ जुलै स्वयंवर मंगलकार्यालयात माझ्या मुलीचे लग्न आहे.” तेव्हा एकच हास्य कल्लोळ झाला. बघता बघता आमच्या वर्गमित्रांना जावई सुध्दा आले. ‘आम्ही आता सासरे झालो.’ विनोद सोनवणेला तर पाच वर्षांची नात आहे आणि आजोबा ही झालो. अन् या नंतर वेळ होती त्या “अविस्मरणीय क्लिक” ची …आजची आठवण कायम सगळ्यांच्या स्मरणात राहावी यासाठी मित्रांच्या सोबतीने एक ग्रुप फोटो काढला , व्हिडिओ शूटिंग झाली, सेल्फी झाल्या नंतर पुढे नित्याचा स्पेशल चहाची …चहा बरोबरचया ठिकाणी रंगल्या त्या कधी न संपणाऱ्या गोष्टी, किती बोलू आणी कुणाकुणाला बोलू असं प्रत्येकाला होत होतं. शाळेत केलेल्या खोड्यापासून ते आज आपणं जिथं पोहचलो आहोत तिथं पर्यंतच्या गप्पा च गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात बॉबी काळेचा चा फोन आला की, ‘मी मुंबई वरुन निघालो तुम्हाला ८ वाजता जॉईन करतो. खरं तर आमचंच चुकलं होतं नीट चौकशी न करता हे फक्त २० मित्रांचे नियोजन होते लोकांचं होतं अन् आपल्या गेट टुगेदर मध्ये तब्बल ३२ जण … आहे की नाही गंमत… वेळेवर कन्हैय्या ने गरमागरम जिलेबी, राकेश ने बग्गा ची कचोरी, समोसा आणि नेहमीप्रमाणेच नितीन ने बिसलेरी पाणी व अनलिमिटेड इलायची चहाचे नियोजन केले
ज्याने १० क हा ग्रुप निर्माण केला, आताचे गेट टुगेदर असो वा नोव्हेंबर २०१६ ला झालेलं गेट टुगेदर, ह्या दोन्ही वेळेस व्यवस्था करणारा अगदी लहान लहान गोष्टींची आठवण करणारा अमित गरुड.. अगदी गेट टुगेदरच्या दिवशी फोन करून “सगळं काही व्यवस्थित आहे का ?’ याची माहिती घेत होता त्या अमित ला काही कारणास्तव येता आलं नाही. त्याची अनुपस्थिती क्षणोक्षणी जाणवत होती. मित्रा! पुन्हा एकदा जमू खास तुझ्यासाठी!एक खास अन् आवर्जून उल्लेख करावा लागेल नितीन छाजेडचा नेहमीच तो त्याच्या ऑफिसची जागा विविध कार्यक्रमासाठी तो अगदी वेळेवर जरी सांगितले उपलब्ध करून देतो. तो बाहेर गावी असतांनाही त्याचा ऑफिसचा स्टाफ उत्तम प्रकारे मदत करतात. या सगळ्यांचे व आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार, आपण सगळे जिवलग मित्र आलात आणि तो एक दिवस अविस्मरणीय केला त्याबद्दल हृदयापासून
लेखक – विनोद पाटील – राकेश शहा