इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छायाचित्रण किंवा फोटोग्राफी प्रत्येकालाच आवडते, मोबाईलमुळे आजच्या काळात फोटोग्राफी हा जणू काही छंदच बनला आहे, परंतु पूर्वीच्या काळी कॅमेराने फोटो काढले जात होते. त्यामुळे त्याला वेळेला खूप महत्त्व होते. असाच एक कॅमेरा ज्याची बोली सुमारे 117 कोटी रुपये लावण्यात आली आणि तो चक्क या किमतीला विकला गेला.
जगात एकापेक्षा एक भारी कॅमेरे आहेत. पण तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात महाग कॅमेरा कोणता आहे ? जगातील सर्वात महागड्या कॅमेऱ्याचा किताब कोणाला देण्यात आला ? Leica कॅमेरा मालिका क्र. 105 लिलावात सर्वाधिक किमतीत खरेदी करण्यात आली आहे.
हा Leica कॅमेरा 1923 मध्ये लाँच करण्यात आला होता. म्हणजे Leica 0 मालिका क्र. 105 कॅमेरा लॉन्च होऊन जवळपास 100 वर्षे पूर्ण करत आहे. लॉन्च झाल्यानंतर कॅमेरा 2018 मध्ये US 2,633,568 डॉलर्स मध्ये लिलाव झाला. दुसऱ्यांदा, हा कॅमेरा ११ जून २०२२ रोजी पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात आला होता, जिथे कॅमेऱ्याचा विक्रमी किमतीत लिलाव सुमारे 117 कोटी रुपयांमध्ये करण्यात आला, त्याचा स्वतःच एक जागतिक विक्रम आहे. कॅमेरा लिलाव इव्हेंट जर्मनीच्या लीट्झ पार्कमध्ये आयोजित करण्यात आला होता.
कॅमेरा क्रमांक 105 ऑस्कर बर्नॅकचा मालकीचा होता, त्याने पहिल्या महायुद्धाच्या काही काळापूर्वी “लिलीपुट कॅमेरा” डिझाइन केला होता. तो Leica चा प्रोटोटाइप होता. ज्याने अनेक आयुष्य या कॅमेऱ्यासोबत घालवले आहे. Leitz हा जगातील पहिला 35 मिमी कॅमेरा आहे, आधुनिक छायाचित्रणाचा तो पाया मानला जातो. अर्न्स्ट लीट्झने 1923 आणि 1924 मध्ये प्रोटोटाइप 0 मालिकेची 23 मॉडेल्स बनवली. यापैकी एक अद्वितीय 0-मालिका कॅमेरा क्रमांक 105 होता. ज्याचा लिलाव 40व्या Leitz Photographica ऑक्शनमध्ये 14.4 दशलक्ष युरोमध्ये झाला आहे.
leica world record camera costly in world price