नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लडाखच्या लेह जिल्ह्यात आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून थेट खोल दरीत कोसळले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत नऊ जवान शहीद झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी दक्षिण लडाखमधील न्योमाच्या केरीमध्ये हा अपघात झाला. सध्या रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली असून ते बचावकार्यात गुंतले आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांमध्ये आठ जवान आणि एक जेसीओ (ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर) यांचा समावेश आहे. सैनिक कारू चौकीतून लेहजवळील कायरीकडे जात होते. या अपघातात अनेक जवान जखमीही झाले आहेत.
लडाखच्या लेह जिल्ह्यात शनिवारी एक भीषण रस्ता अपघात झाला. येथे कियारी टाउनच्या काही अंतरावर भारतीय लष्कराचे वाहन दरीत पडले. या दुर्घटनेत ९ जवानांचा बळी गेला. तर अनेक जवान जखमी होण्याची भीती आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी दक्षिण लडाखमध्ये हा अपघात झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शहीद आणि जखमी जवानांची ओळख अद्याप समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराचे वाहन लेहहून नयोमाकडे जात होते. लडाख रोड अपघात कायरीच्या सहा किलोमीटर आधी झाला होता. ट्रक खोल खड्ड्यात पडला. सायंकाळी ५.४ वाजता हा अपघात झाला. या दुर्घटनेत 9 जवानांचा बळी गेला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी दक्षिण लडाखमध्ये हा अपघात झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
Leh Ladakh Indian Army Truck Accident 9 Jawan Death
Fell into Ditch Road Defence