इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्नाचे खोटे वचन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले अशी तक्रार करत व संबंधित पुरुषावर बलात्काराचा आरोप करत ३३ वर्षीय महिलेने न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, न्यायालयाने या प्रकरणात निकाल पुरुषाच्या बाजूने देत त्याला निर्दोष मुक्त केले आहे.
केरळ उच्च न्यायालयात एका पुरुषाविरुद्ध महिलेकडून याचिका दाखल करण्यात आली होती. हायकोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली तेव्हा प्रकरणातील अनेक पैलू समोर आले आणि त्यानंतर मोठा निर्णय देण्यात आला. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान असे दिसून आले की, ज्या मुलीचे (फिर्यादी) त्या पुरुषाशी संबंध होते तिला त्या पुरुषाचे लग्न झाल्याचे आधीपासून माहित होते. दोघे २०१० पासून एकमेकांना ओळखत होते. तिला २०१३मध्ये मुलाच्या लग्नाची माहिती मिळाली, त्यानंतरही दोघांनी आपले संबंध सुरू ठेवले. दोघांचे नाते संबंधित पुरुषाच्या लग्नापूर्वीचे होते, जे नंतरही कायम राहिले. मुलाने घटस्फोट घेतल्यानंतरही दोघांमधील संबंध कायम राहिले. या प्रकरणात मुलावर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन संबंध ठेवल्याचा आरोप सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे तक्रारदाराने केलेल्या आरोपांचे खंडन केले.
संबंध परस्पर संमतीने
केरळ हायकोर्टाने या दोघांमधील शारीरिक संबंधांवर भाष्य केले. आरोपी आणि तक्रारदार यांच्यातील संबंध हे परस्पर संमतीने ठेवल्या गेले होते. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आरोपीने मुलीशी लग्न करण्याचे वाचन दिल्याचे कुठेही समोर आले नाही. तसेच त्याने मुलीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचेही सिद्ध झाले नाही. अशा परिस्थितीत या काळात निर्माण झालेली नाती बलात्काराच्या व्याख्येत ठेवता येत नसून, हे प्रेम आणि रोमांच या कक्षेत बसणारे असल्याचे न्यायालय म्हणले आहे.
Legal Kerala High Court Rape Case Accused