नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्नी दीर्घकाळापासून पतीपासून लांब असेल तर त्याने दुसऱ्या महिलेच्या सहवासात राहणे क्रुरता ठरणार नाही, असे अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षण दिल्ली हायकोर्टाने नोंदविले आहे.
दिल्ली हायकोर्टात गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाची याचिका प्रलंबित होती. या प्रकरणावर सुनावणी देताना कोर्टाने हे निरीक्षण नोंदविले. या जोडप्याला दोन मुले आहेत आणि अशा स्थितीत पती वेगळ्या महिलेसोबत राहतो आहे, हे जरी मान्य केले तरी या प्रकरणात पक्षकाराने केलेल्या कृतीला क्रुरता म्हणता येणार नाही. कारण जोडप्यातील पती पत्नी तब्बल २००५ पासून विभक्त आहेत. तसेच, त्यांच्यात पुन्हा एकत्र येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे सहाजिकच दुसऱ्या महिलेसोबत राहून त्याला जर आरामदायी वाटत असेल तर त्याला क्रुरतेच्या आधारावर घटस्फोट घेण्यापासून वंचित करता येणार नाही. कारण घटस्फोटाची याचिका प्रलंबीत असतानाच्या काळानंतर बऱ्याच उशीरा घडलेली ही घटना आहे, असे सांगत कोर्टाने दुसऱ्या स्त्रीसोबतचा सहवास क्रुरता ठरविण्यास नकार दिला. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने हे मत नोंदवले.
असा होता पतीचा दावा
पतीने कोर्टात सांगितले की, पत्नीने वैवाहिक जीवनामध्ये प्रचंड त्रास दिला. तिने माहेरच्या लोकांना आणून मारहाणही केली. कोर्टाच्या निदर्शनात असेही आणून देण्यात आले की, पत्नी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 506(II) अंतर्गत गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर पत्नीच्या आईने मुलगा व्हावा यासाठी पत्नीला काही औषधेही दिली होती. परंतु, त्यामध्ये तिचा गर्भपात व्हावा हा हेतू होता. कारण ती औषधे गर्भपाताचीच होती. कोर्टाने सर्व बाजू ऐकून घेतल्यावर हा निर्णय दिला.
Legal Delhi High Court Family Dispute Husband Wife
Husband Wife