रविवार, नोव्हेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लिव्ह इन रिलेशनशीप… वारंवार जोडीदार बदलणे… हायकोर्ट म्हणाले…

सप्टेंबर 4, 2023 | 5:31 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Court Justice Legal


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एकासोबत फिरायचे, दुसरासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आणि तिसऱ्याच्याच नावाचे मंगळसुत्र घालायचे, असा प्रकार सध्या सर्रास सुरू आहे. लिव्ह इनसारच्या संकल्पनांमुळे वाटेल तेव्हा जोडीदार बदलविण्यात येत आहे. यामुळे भारतीय विवाहसंस्था मोडकळीस येण्याची भीती समाजातून व्यक्त होत असतानाच अलहाबाद उच्च न्यायालयानेही यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. हे सर्व प्रकार भारतीय कुटुंबव्यवस्था नष्ट करण्याचा सुनियोजित प्रयत्न असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.

गेल्या काही काळात बदलत्या जीवनशैलीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या प्रमाणामध्येही लक्षणीय अशी वाढ झाली आहे. दरम्यान, लिव्ह इन रिलेशनशिपबाबतच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना अलाहाबाद हायकोर्टाने परखड मत मांडले आहे. भारतीय विवाहसंस्थेला सुनियोजित पद्धतीने नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे कोर्टाने म्हटले आहे. यावेळी कोर्टाने सांगितले की, विवाहाच्या माध्यमातून ज्या प्रकारे सुरक्षा आणि स्थायित्वाबाबतचा विश्वास मिळतो तसा तो लिव्ह इनच्या माध्यमातून मिळवता येत नाही. या व्यवस्थेमुळे कशा प्रकारचं नुकसान होत आहे. यामुळे आपसातील नाती प्रभावित तर होत नाहीत ना, याचा विचार आपण केला पाहिजे.

न्यायमूर्ती सिद्धार्थ यांच्या कोर्टाने सांगितले की, वारंवार बॉयफ्रेंड बदलण्याची इच्छा कुठल्याही स्थायी आणि निरोगी समाजासाठी चांगली म्हणता येणार नाही. जेव्हा इतर काही विकसित देशांप्रमाणे या देशामध्ये वैवाहिक संबंध हे पूर्णपणे कालबाह्य ठरतील. तेव्हाच लिव्ह इनमधील नात्याला आपण सामान्य समजू शकतो. मात्र विकसनशील देशांमध्येही ही समस्या गंभीर रूप धारण करत चालली आहे. जर तशा प्रकारची समस्या इथेही बनली. तर भविष्यात आम्हा सर्वांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. न्यायमूर्ती सिद्धार्थ यांनी सांगितले की, विवाह आणि लिव्ह इनमध्ये अविश्वासाला प्रगतिशील समाजाप्रमाणे पाहिले जात आहे. तरुण अशा प्रकारच्या विचारांकडे त्याचे नुकसान न पाहता आकर्षित होत आहेत.

या प्रकरणावर झाली सुनावणी
प्रकरण सहारनपूरमधील एका खटल्याशी संबंधित आहे. त्यात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडवर बलात्काराचा आरोप केला होता. सदर तरुण हा १९ वर्षीय तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. परस्पर सहमतीनं त्यांच्यामधील नातं प्रस्थापित झालं होतं. त्यातून ही तरुणी गर्भवती राहिली. गर्भवती राहिल्यानंतर या तरुणीने देवबंद पोलीस ठाण्यामध्ये बलात्कार प्रकरणी तक्रार दिली. त्यात तरुणीने तरुणावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आणि नंतर नकार दिल्याचा आरोप केला. त्यानंतर १८ एप्रिल रोजी आरोपीला अटक करण्यात आली होती.

Leave In Relationship Allahabad High Court Spouse
Couple

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बहिणीकडे जायचे होते… पतीने नकार दिला… विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल…

Next Post

दहा हजाराच्या लाच प्रकरणात अभोण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व शिपाई सापडले एसबीच्या जाळ्यात

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
Corruption Bribe Lach ACB

दहा हजाराच्या लाच प्रकरणात अभोण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व शिपाई सापडले एसबीच्या जाळ्यात

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011