बागेश्री पारनेरकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अनेकदा आपल्याला घर किंवा एखादी मालमत्ता भाड्याने घ्यायची असते किंवा द्यायची असते. पण, ते करीत असताना बहुदा आपण भाडेकरार करीत नाहीत. तो का आणि कसा करायला हवा याची फारशी जनजागृती झालेली नाही. त्यामुळेच अनेकदा कायदेशीर आणि अन्य स्वरुपाचे प्रश्न निर्माण होतात. हा करार तुम्ही कुठल्याही शहरात असतानाही तुम्ही तो करु शकता. म्हणजेच, नोकरीसाठी जर तुम्ही मुंबईत असाल आणि तुमचे नाशिक किंवा नागपूरचे घर भाड्याने द्याचचे असेल तर त्यासाठी तुम्हाला नाशिक किंवा नागपूरला जाण्याची गरज नाही. तुम्ही मुंबईत बसूनच हा करार करु शकतात.
सर्वसाधारणपणे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार केला जातो. पण कायद्याने तो वैध नाही. कायद्याने भाडेकरार कायद्यांतर्गत मुद्रांक विभागात जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. हा भाडेकरार घरपोचही करून मिळतो. भाडेकरार घरपोच कसा करायचा, त्याची प्रकिर्या, शुल्क किती आहे, त्याचे महत्त्व नेमके काय याविषयी जाणून घ्या हा व्हिडिओ
Vdeo editing – सोनल गावकर – गिते