अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला शहराला पाणी पुरवठा करणारी विंचूर रोडवरील पाण्याच्या टाकीची दुरावस्था झाली असून त्यातून पाणी गळती होऊन लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या पाण्याच्या टाकीला अक्षरशा तडे गेले असून त्यातून नेहमी पाणी गळती होत असते. त्यामुळे परिसरातील नागरिक धास्तावले असून कधी ही मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष घालून पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करावी अशी मागणी देखील करीत आहे.