मुंबई – नाशिकमध्ये ऑक्सिजनच्या गळतीत पुरवठा ठप्प झाल्याने तब्बल २२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा तीव्र निषेध सर्व स्तरातून होत आहे. या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आदींनी प्रतिक्रीया दिली आहे. त्या अशा
The tragedy at a hospital in Nashik because of oxygen tank leakage is heart-wrenching. Anguished by the loss of lives due to it. Condolences to the bereaved families in this sad hour.
— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2021
नासिक के एक अस्पताल में ऑक्सिजन लीक होने से हुई दुर्घटना का समाचार सुन व्यथित हूँ। इस हादसे में जिन लोगों ने अपनों को खोया है उनकी इस अपूरणीय क्षति पर अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूँ। बाकी सभी मरीजों की कुशलता के लिए ईश्वर से प्रार्थना करता हूँ।
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) April 21, 2021
नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन काही निरपराध रुग्ण दगावल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना आपल्या शोक संवेदना कळवतो व बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो.
— Governor of Maharashtra (@maha_governor) April 21, 2021
नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सगळेच या सर्व कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहोत. पालकमंत्री @ChhaganCBhujbal जी आणि सर्व अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. ह्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी केली जाईल.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 21, 2021
निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणार्यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
— Pravin Darekar – प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar) (@mipravindarekar) April 21, 2021
ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं.
— Raj Thackeray (@RajThackeray) April 21, 2021
नाशिक मधील झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. ऑक्सिजनच्या गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजले. सरकार ने जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर त्वरीत कारवाई केली पाहिजे. तसेच अशा घटना राज्यात पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) April 21, 2021