पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजगुरूनगर (पुणे) येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा साहित्य क्षेत्रातील कविवर्य पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य प्रतिभा साहित्य पुरस्कार प्रा.लक्ष्मण महाडिक यांच्या ‘स्त्री कुसाच्या कविता’ या काव्यसंग्रहास जाहीर झाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या काव्य पुरस्कारांची घोषणा नुकतीच अध्यक्ष संतोष गाढवे यांनी केली.
सन २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या साहित्य कृतीला जाहीर झाला आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने २०२१ सालातील दीडशे साहित्य कृतींमधून निवड करण्यात आली आहे.त्यांच्या सोबत सातारा येथिल कवी प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांच्या ‘संविधानाच्या स्वप्नातील गाव’ अमरावती येथील संदीप धावडे यांच्या ‘परिवलन परिभ्रमण’,सांगलीचे उत्तमसावन्त यांच्या ‘कुरकूल’ तर पुण्याच्या माधुरी विधाते यांच्या ‘ मल्हारधून’ या काव्य संग्रहांना जाहीर पुरस्कार वितरण रविवार १२ फेब्रुवारी २०२३ रोजी राजगुरुनगरच्या पंचायत समिती सभागृहात सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.यावेळी अ.भा .मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ नेते ,साहित्य प्रेमी उल्हास दादा पवार,माजी आमदार जयदेव गायकवाड,ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे,यांच्या हस्ते होणार आहे,अशी माहिती मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संतोष गाढवे,उपाध्यक्ष सदाशिव अमराळे,प्रमुख कार्यवाह शरद बुटे पाटील व कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी दिली आहे.