इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ओबीसी एकवटला म्हणून जरांगेंनी निवडणुकीत माघार घेतल्याचे सांगत ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेवर जोरदार टीका केली. जरांगे नावाचे वटवाघूळ स्वत.च्या औकातीवर आले असेही ते म्हणाले. बारामतीच्या स्क्रिप्ट प्रमाणे जरांगे बोलतात असा आरोपही केला.
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा आज केली. यावेळी त्यांनी सर्व उमेदवारांना माघार घेण्याचे आवाहन केले. एका जातीवर निवडणूक लढवणे शक्य नाही असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर हाके यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी हाके म्हणाले की मी नेहमी सांगत आलो होतो, ते निवडणूक लढवणार नाहीत किंवा सामोरे जाणार नाहीत. बारामती स्क्रिप्ट नुसार ते वागत आहे. आज ओबीसी एकवटला त्यामुळे त्यांनी रणांगणातून माघार घेतली आहे. बारामतीच्या सांगण्यावरुन माघार घेतली आहे. लढायला वाघाचं काळीज लागते, गनिमी काव्याचा काळ गेला असेही त्यांनी सांगितले.