इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नॉर्थरडॅम येथे खुल्या गटात पार पडलेल्या लॉन टेनिस स्पर्धेत भारताच्या विश्वजीत सांगळे याने विजेतेपद पटकावले आहे. बेनॉइट एच या फ्रान्सच्या खेळाडूचा 6-2,7-5 अशा सरळसेटमध्ये पराभव करून विश्वजीतने विजेतेपद खेचून आणले. हे विश्वजीतचे सलग तिसरे विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने ओसाका-जपान, बर्लिन-जर्मनी या ठिकाणीही उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत विश्वजीतने विजयी घोडदौड सुरू ठेवली.
स्पर्धेत टिकायचे असेल तर खेळाचा सराव,नियोजनबद्ध व्यायाम,योग्य तो संतुलित आहार महत्वाचा आहेच.पण त्याबरोबर आर्थिक नियोजनासाठी खुप प्रयत्न करावे लागत आहेत हे विश्वजीत सांगतो. विश्वजीत मुळचा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील रहिवाशी आहे. शिक्षण व खेळाचे योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी काही वर्षापासून मुंबईत वास्तव्यास आहे. खेळातील उत्तम परफॉर्मन्स दाखवून ही खेळाडूला आर्थिक मदतीसाठी वणवण करावी लागते हे खरच खुप त्रासदायक असते,अशी भावना विश्वजीतच्या आईने व्यक्त केली.खेळातील सातत्य ठेवण्यासाठी आर्थिक हातभार मिळणे महत्वाचे आहे.
ओसाका (जपान) येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेमध्ये हिंदुस्थानचा (महाराष्ट्र -मुंबई) युवा टेनिसपटू विश्वजीत सांगळे यांनी विजेतेपद पटकावत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. कोविड काळानंतरचे विश्वजीतचे हे पहिले विजेतेपद आहे. आजचा विजय विश्वजीतला येणाऱया ऑलिम्पिकसाठी व एटीपी स्पर्धांच्या वाटचालीत कायम प्रेरणा देत राहील. खेळांसाठीचे अथक परिश्रम, आर्थिक मदतीसाठीची धडपड या सगळय़ाचे आज चीज झाले. शारीरिक व मानसिक सुदृढता यांचे संतुलन साधत खेळाचा सराव उत्तम केल्यामुळे विजेतेपद पटकावता येते हे तितकेच खरे, अशी आनंदी प्रतिक्रिया विश्वजीतच्या आईने व्यक्त केली आहे.
lawn tennis tournament vishwajit sangale 3rd success