इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनात जिद्द असेल आणि कष्ट करायची तयारी असेल तर आपल्या यशाच्या कोणीही येऊ शकत नाही असे म्हटले जाते, कोणत्याही खेळाच्या बाबतीत देखील असे घडू शकते. सध्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू असून यामध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यातच लॉन बॉल सारख्या क्रीडा स्पर्धेत भारताने चौथे सुवर्णपदक मिळविले, मात्र या पदकाची हे पदक पटकावणाऱ्या युवतींनी अनेक अडचणीवर मात करीत हे यश संपादन केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया व रुपा राणी तिर्की या भारतीय महिलांनी इतिहास घडविला. लॉन बॉल्स हा क्रीडा प्रकार भारतीयांच्या फारसा परिचयाचाही नव्हता, परंतु या चार महिलांनी ऐतिहासिक पदक निश्चित करताच याची चर्चा सुरू झाली. त्यात भारतीय महिलांनी सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कडवा संघर्ष मोडून काढताना १७ – १० असा विजय मिळवला. भारताचे हे एकूण चौथे सुवर्णपदक ठरले.
खरे म्हणजे सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्या लेकींचा हा प्रवास सोपा नव्हता, अनेक अडचणींवर मात करत त्यांनी नेत्रदिपक भरारी घेतली आहे. त्यातच लॉन बॉल्ससाठी कोणताही फंड नाही, कोच नाही, असे असतानाही त्यांनी आपली मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सुवर्णपदक पटकावलं आहे. चारही जणी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधील असून सर्वांचे राहणीमान अगदी साधे आहे.
परंतु हे सर्व असताना त्यांनी इतिहास रचला आहे. “जी मेहनत आम्ही केली, ज्याचा विचार आम्ही केला ते आम्ही अखेर मिळवले. गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्ही यासाठी मेहनत करत होतो. आम्ही खेळत होतो, अनेक मेडल्स आम्ही जिंकले. पण क़ॉमनवेल्थ गेम्समध्ये मेडल जिंकणं आमचं ध्येय होतं” असेही टीम इंडियाने म्हटलं आहे.
विशेष म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स 2018 नंतर या महिला टीमकडे कोणीच कोच नव्हतं. म्हणजेत गेल्या चार वर्षांपासून त्या स्वत:च तयारी करत होत्या. आता चार वर्षांनी त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं आणि भारताने सुवर्णपदक जिंकलं. लॉन्स बॉल्स अनेक वर्षांपासून कॉमनवेल्थचा गेम्सचा हिस्सा आहे. पण भारताने पहिल्यांदा यात मेडल जिंकलं आहे.
या महिला टीममधील लवली चौबे झारखंडची असून ती पोलीस कॉन्स्टेबल आहे. नयन मोनी साकिया फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये नोकरी करते. पिंकी दिल्लीच्या एका शाळेत शिक्षिका आहे. तर रुपा राणी झारखंडमध्ये खेळाशी संबंधित अधिकारी आहे. सुवर्णपदक जिंकल्यानंतर संवाद साधताना त्यांनी स्वतः बाबत माहिती दिली आहे.
लॉन बॉल खेळ पाहताना प्रथम दर्शनी असे दिसेल की दोन्ही टीममध्ये चार खेळाडू असून तीन खेळाडू दूर ठेवलेल्या पिवळ्या चेंडूच्या आपल्या जवळील मोठ्या चेंडूला जवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक फेरीत ९ प्रयत्न केले जातात. १५ फेरीपर्यंत हा खेळ सुरू राहतो आणि जेवढे ज्याचे गुण अधिक त्याला विजयी घोषित केले जाते. नाणेफेक महत्त्वाची ठरले, कारण जो संघ आधी चेंडू फेकणार असतो तो प्रतिस्पर्धीला एका ठराविक अंतरापर्यंत जॅक टाकण्याची संधी देतो आणि त्यानंतर सामना सुरू होतो. दोन्ही संघांचे खेळाडू चेंडू जॅक पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.
Lawn Bowl Indian Women Team Success Story