नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आम आदमी पक्षाने सत्ता मिळवण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा वापर केल्याचा आरोप केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. दिल्ली दारू धोरण प्रकरणी अरविंद केजरीवाल आज सीबीआयसमोर हजर झाले. दरम्यान, कायदामंत्र्यांनी केजरीवाल यांच्या पक्षावर हा आरोप केला आहे. किरेन रिजिजू यांनी ट्विट केले की, आता त्यांना सत्ता मिळाली आहे, मला खात्री आहे की ते अण्णाजींचेही ऐकणार नाहीत.
अण्णाजी आणि जनतेला मुर्ख बनवण्यासाठी भ्रष्टाचार हे केवळ निमित्त असल्याचे रिजिजू म्हणाले. अण्णाजींचा वापर फक्त सत्ता मिळविण्यासाठी झाला आणि भ्रष्टाचाराच्या नावाखाली संसाधनांची लूट झाली. रिजिजू यांनी अण्णा हजारे यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या दारू धोरणावर टीका केली आहे.
https://twitter.com/KirenRijiju/status/1647278693298077696?s=20
अण्णा हजारे यांनी ५ एप्रिल २०११ रोजी भ्रष्टाचाराविरोधात दिल्लीत आमरण उपोषण केले होते. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या या मोहिमेत अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, मनीष सिसोदिया आदींनीही सहभाग घेतला. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मजबूत लोकपाल कायदा आणावा, अशी अण्णा हजारे यांची मागणी होती. या आंदोलनानंतर अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया आणि इतरांसोबत आम आदमी पक्षाची स्थापना केली आणि आज आप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि या पक्षाची दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकारे आहेत.
दिल्लीचे नवीन उत्पादन शुल्क धोरण बनवताना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे आणि निविदा प्रक्रियेतही त्रुटी होत्या. नवीन मद्य धोरणामध्ये GNCTD कायदा 1991, व्यवसाय नियम 1993, दिल्ली उत्पादन शुल्क कायदा 2009 आणि दिल्ली उत्पादन शुल्क नियम २०१० चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. नवीन धोरणामुळे दारू परवानाधारकांना अवाजवी फायदा झाला आहे. निविदा काढल्यानंतर दारू ठेकेदारांचे १४४ कोटी रुपये माफ करण्यात आले.
https://twitter.com/KirenRijiju/status/1647270370578415618?s=20
Law Minister Kiren Rijiju Allegation on Arvind Kejriwal Politics