हसण्याच्या पद्धतीवरून असा कळतो स्वभाव
प्रत्येकाच्या हसण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. यावरून देखील आपल्या स्वभावाचा काही प्रमाणात अंदाज बांधता येऊ शकतो, हे वाचा व आपणही अंदाज बांधा…..
- पंडित दिनेश पंत
मोठ-मोठ्याने हसत मागे झुकणारी व्यक्ती मोकळ्या मनाची व चांगली सल्लागार असते….
कोणत्याही विनोदावर केवळ स्मितहास्य करणाऱ्या व्यक्तीचे अंतर्मन जाणणे अवघड असते…..
प्रमाणापेक्षा जास्त हसणारी व्यक्ती काहीशी खर्चिक तसेच महत्वाचा निर्णयांबाबत दुसऱ्यांवर अवलंबून असते..
कोणत्याही विनोदावर अजिबात न हसणारी व्यक्ती स्वतः उत्तम विनोदी असते…..
कोणत्याही प्रसंगात सहजपणे विनोद शोधणारी व्यक्ती सर्वांना हवीहवीशी असते….
इतरांच्या विनोदावर आपणही विनोद सांगून उत्तर देणारी व्यक्ती गुंतवणुकीस प्राधान्य देणारी असते….
काही ठराविक प्रकारच्या विनोदावरच हसणारी व्यक्ती आरोग्यविषयक जागरूक असते….
जुने विनोद आठवून हसणारी व्यक्ती नात्यांमध्ये रमणारी भूतकाळाच्या आठवणींमध्ये हरवणारी असते….
एखाद्या घटनांमध्ये नसणारा विनोद शोधणारी व्यक्ती बारकावे हेरणारी असते….
हसणे न आवडणारी व्यक्ती भावनिक दृष्ट्या दुःखी असते….
पुढे झुकून हसणारी व्यक्ती इतरांच्या त्रुटी शोधण्यात अग्रेसर असते….
समोरच्याला टाळी देऊन हसणारी व्यक्ती प्रसंगात फारशी समरस होत नाही….
विनोदी माहोल आवडणारी व्यक्ती गोड खाणार असते….
प्रसंगनिष्ठ विनोद सांगणारी व्यक्ती साथ देणारी तर व्यक्तिनिष्ठ विनोद सांगणारे व्यक्ती पाठीमागे उणीदुणी काढणारी असू शकते….
आपणही आपले निरीक्षण नोंदवा..