इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लातूर जिल्ह्यातील तळेगाव येथे ७५ टक्के जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. गावातील १०३ शेतक-यांचा ३०० एकर जमिनीचा यात समावेश आहे. या दाव्यामुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
या जमिनीवर महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबादच्या न्यायालयाने वक्फ याचिका क्रमांक १७/ २०२४ अन्वये हा दावा केला आहे. त्यासाठी १०३ शेतक-यांना नोटीसा आल्या आहेत. या सर्व शेतक-यांनी एकत्रित येऊन नोटिसला उत्तर देण्याचे ठरवले आहे. तीन ते चार पिढ्यांपासून या जमिती या शेतक-यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या जमिनी परत जाईल ही भीती या शेतक-यांना आहे.
या प्रकरणाची सुनावणी २० डिसेंबरला होणार आहे. या प्रकरणी शासनाने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी गावातील शेतक-यांनी केली आहे.