विशेष प्रतिनिधी, मुंबई
नैसर्गिक युरेनिअमचा अवैध साठा बाळगल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकानं मुंबईत दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आपल्या ताब्यात घेतला आहे. जीगर जयेश पांड्या आणि अबू ताहीर अफजल चौधरी यांच्याकडे नैसर्गिक युरेनियमचा ७ किलो १०० ग्रॅम इतका अवैध साठा सापडला होता.
याचं बाजारमूल्य २१ कोटी ३० लाख रुपये इतकं आहे. या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकानं मुंबईतल्या काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता. मात्र आता केंद्रीय गृहमंत्रालयानं निर्देश दिल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेनं या प्रकरणाचा तपास आपल्या ताब्यात घेऊन, या प्रकरणी नवा गुन्हा दाखल केला आहे.