मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील अनेक समस्यांपैकी एक महत्त्वाची समस्या म्हणजे रस्ते अपघाताची मृत्यू होय. गेल्या काही वर्षात रस्त्याच्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अत्यंत चिंताजनक आहे, त्यातच आता पुन्हा एकदा रस्त्याच्या अपघाताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, त्याला कारण म्हणजे टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधन होय, त्यानंतर केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आहे. कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सीटबेल्ट न लावल्यास आरटीओकडून दंड आकारण्यास येईल. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सीट बेल्टबाबत घोषणा केली आहे.
आता कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सीट बेल्ट लावावा लागेल, म्हणजेच आता कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल. नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही घोषणा केली. भारतात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १८ ते ३४ वयोगटातील आहे. रस्ते अपघात कमी करणे हे एकमेव असे क्षेत्र आहे, जिथे मला गेल्या ८ वर्षात यश मिळालेले नाही, असे गडकरी पुढे म्हणाले.
गडकरी पुढे म्हणाले की, सायरस मिस्त्री अपघातामुळे मी ठरवले आहे की, ड्रायव्हरच्या सीटवर जसा सीट बेल्ट आहे तसाच मागील सीटवरही अलार्म असेल. कारमधील मागील सीटवर सीटबेल्ट न लावल्यास दंड आकारला जाईल. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. यानंतर वेगाने धावणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्याची आणि मागे बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्टचा वापर अनिवार्य करण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अपघात होऊ नयेत यासाठी रस्त्यांच्या हिशोबाने डिझाईन असावे, यावरही त्यांनी भर दिला आहे.
सीट बेल्ट न लावल्याबद्दल चालान (दंडात्मक दंड) परवानगी दिली जाईल. आदेशाची अंमलबजावणी 3 दिवसांच्या आत केली जाईल, असेही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. सायरस मिस्त्री यांचा रविवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. मिस्त्री गुजरातहून महाराष्ट्रात जात असताना पालघर जिल्ह्यात हा अपघात झाला.सायरस मिस्त्री आणि जहांगीर पांडोळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनाहिता पांडोळे आणि दारियस पांडोळे हे दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर अनाहिता पांडोळे कार चालवत होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. या अपघातात पुढच्या सीटवरील एअरबॅग्ज निघाल्या होत्या परंतु मागील सीटवरील एअरबॅग बाहेर पडल्या नाहीत असेही पोलिसांनी सांगितले.
एका कार्यक्रमात नितीन गडकरी बोलताना म्हणाले की, देशातल्या सर्वच नागरिकांनी रस्ते सुरक्षितता या विषयावर गांभीर्याने विचार करून, उदासीनता दूर केली पाहिजे, मानसिकता बदलली पाहिजे, असं ते म्हणाले. त्यांनी सांगितलं, ‘मी चार मुख्यमंत्र्यांच्या कारमधून प्रवास केला आहे. मी त्यांची नावं सांगणार नाही. पण त्यांच्या कारमध्ये मी पाहिलेला प्रकार भयानक होता. मी ड्रायव्हरशेजारच्या सीटवर बसलो होतो. तिथे बेल्ट लावण्याच्या ठिकाणी एक क्लिप लावण्यात आली होती, असं मला दिसलं. त्याचं कारण म्हणजे सीट बेल्ट लावलेला नसला, तरी बीप बीप साउंड येऊ नये, यासाठी केलेली ती व्यवस्था होती. मी ड्रायव्हर्सना दटावलं आणि त्या क्लिप्स काढून टाकल्या. हे पाहिल्यानंतर मी अशा क्लिप्सचं उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली.’
आता याबद्दल जनजागृतीसाठी सरकार क्रिकेटर्स, बॉलिवूड स्टार्स, माध्यमे आदींची मदत घेत असल्याचंही गडकरी यांनी नमूद केलं. यावेळी गडकरींनी हेही कबूल केलं, की तरुण असताना ते स्वतःही वाहतुकीचे नियम तोडायचे. ते किती भयानक ठरू शकतं, याची तेव्हा कल्पना नव्हती, असंही त्यांनी सांगितलं. मात्र वाहतुकीचे नियम पाळणं किती अत्यावश्यक आहे, हे नंतर कळलं. नागरिकांनी विचार, मानसिकता बदलली पाहिजे. वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत,’ असे गडकरी म्हणाले. तसेच आता केंद्र सरकारने जरी सर्वांना सीट बेल्टचा नियम केला तरी कारमध्ये बसलेल्या नागरिकांनी स्वयंस्पर्तीने सेट बिल लावणे अत्यंत आवश्यक आहे.
Last 8 Year Failure Minister Nitin Gadkari Clarifies