पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या भवितव्यासमोरच प्रश्न निर्माण झाला आहे. 2019 नंतर पंधरापैकी तेरा राज्यांत काँग्रेसचे पानिपत झाले. सगळ्याचे खापर राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर फोडून काँग्रेसवाले नामानिराळे राहत आहेत. देशाच्या राजकारणात काँग्रेसला खरोखर भवितव्य आहे का? देशाला काँग्रेसची आणि काँग्रेसला देशाची गरज आहे का?