लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विंचूर – प्रकाशा राज्य मार्गांवरील लासलगाव एसटी बस स्थानकासमोरील फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मागील बाजूचे शटर मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे रोख रक्कमेसह अठरा ते वीस लाख रुपयांचे आयफोन, सॅमसंग सारखे महागडे दीडशेहून अधिक मोबाईल फोन गोणीमध्ये भरून असा अंदाजे अठरा ते वीस लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
ही चोरीची घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. पोलिसांना चोरीचा सुगावा लागू नये म्हणून सीसीटीव्हीचे असलेले डीव्हीआर सुद्धा या चोरट्यांनी चोरून नेले आहे. या चोरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली असून व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शेजारी असलेल्या भारत पेट्रोलियम पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये काही सेकंदाचा असलेला सीसीटीव्हीच्या फुटेज आधारे लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20