लासलगाव – लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेची जीर्ण झालेली पाईप लाईन वारंवार लिकेज होत असल्याने होणारा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे विशेष प्रयत्नाने जीर्ण पाईप लाईन बदलण्यासाठी साडे सोळा कोटी रुपयांची निविदा निघणार असून बदलावयाच्या पाणी पुरवठा योजना पाईप लाईनचे सर्वेक्षण सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आले असुन ,येत्या एक ते दिड महिन्यात टेंडर काढण्यात येईल अशी माहिती लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर यांनी दिली.
आज झालेल्या बैठकी प्रसंगी लासलगावचे सरपंच व १६ गाव पाणी पुरवठा अध्यक्ष जयदत्त होळकर, उपसरपंच अफजल भाई शेख, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, मंगेश गवळी, जी.टी.खैरणार, शशीकांत कदम आदि उपस्थित होते. लासलगावसह १६ गाव पाणी पुरवठा नविन पाईप लाईन ही नांदुर मध्यमेश्वर ते पाबळवाडी पर्यंत काम हे जून 2022 महिन्या अखेर पर्यंत पुर्ण केली जाणार आहे. याची प्रस्तावित अंदाजीत रक्कम १६ .५० कोटी इतकी आहे. असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी उपअभियंता प्रतापराव पाटील ( प्रभारी ) व रावसाहेब बिन्नर, अभियंता बांगरे यांनी सांगितले.