लासलगाव – वडिलांच्या निधनानंतर दशक्रिया विधी फाटा देऊन शेतकरी आत्महत्यापिडीत बालकांच्या आश्रमाला दान करण्याचा आदर्श दावचवाडी येथील उशीर परिवाराने घालून दिला आहे.
निफाड तालुक्यातील दावचवाडी गावचे रहिवासी व जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी दशरथ दादा उशीर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून दशक्रिया विधीला फाटा देत शेतकरी आत्महत्याग्रस्त बालकांच्या आधारतिर्थ आश्रमास पंचवीस हजार रुपयांची देणगी देऊन समाजा समोर आदर्श घालून दिला आहे. स्व.दशरथ पाटील उशिर यांची विजय, महेंद्र, रवींद्र आणि प्रमोद ही चारही मुले उच्चशिक्षित असुन सामाजिक कार्यात उत्साहाने पुढाकार घेत असतात. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.