लासलगाव – कोरोना नंतरच्या दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर लासलगाव व परिसरामध्ये श्री रामनवमी,हनुमान जयंती,महावीर जयंती आणि भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्ताने लासलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ४४ गावाची शांतता समितीची बैठक सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ ,सरपंच जयदत्त होळकर, उपसरपंच अफजल शेख यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
शासनाच्या परिपत्रकात प्रमाणे आपले धार्मिक सण शांततेत व उत्साहात साजरे करण्याचे आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी केले. यावेळी सरपंच जयदत्त होळकर, अफजल शेख, रामनाथ शेजवळ, राजेंद्र चाफेकर अनिल नवले, राम बोराडे, मयूर झांबरे ,सनी पाठक, निलेश पटणी, मयुर बोरा, दिलीप बोथरा,संदीप उगले,किरण शिरसाठ,रवी घोडे,नाना सूर्यवंशी,गौरव गावडे, पिंपळगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शशिकांत कदम,मिरण पठाण,पिंटू शिकलकर, विलास खैरणार, पोलीस पाटील विलास काळे, आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.