लासलगाव – पाचशे रूपयांच्या २९१ बनावट चलनी नोटा व्यवहारात आणऱ्या टोळीचा पर्दाफाश लासलगाव पोलीसांनी केला असून एका महिला डॅाक्टरसह पाच जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार ५०० दराच्या बनावट १ लाख पंचेचाळीस हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. १२ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे लासलगाव येथील राहणारे मोहन बाबुराव पाटील व डॅा. प्रतिभा बाबुराव घायाळ दोन्ही रा. बोराडे हॉस्पीटल जवळ लासलगाव व विठ्ठल चपलाल नाबरीया, रा कृषीनगर, कोटमगाव रोड लासलगाव ता. निफाड यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी आमचा मित्र रविंद्र हिरामण राऊत, रा स्मारक नगर, पेठ व विनोद मोहनभाई पटेल रा पंचवटी नाशिक हे आम्हाला सायंकाळी बनावट ५०० दराच्या चलनी नोटा देणार आहे अशी माहिती दिल्याने पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी केलेल्या मार्गदर्शनाने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण सोनवणे, सपोउनि राजेंद्र अहिरे पोलीस हवालदार बाळु सांगळे . पोलीस नाईक कैलास महाजन , योगेश शिंदे , संदिप शिंदे , पोका प्रदिप आजगे, गणेश बागुल, कैलास मानकर, सागर आरोटे देविदास पानसरे महिला पोलिस शिपाई मनीषा शिंदे यांचे पथक तयार करून सदर पथकाने येवला रोड विंचुर येथे सापळा रचुन मोहन पाटील, प्रतिभा घायाळ, विठठल नावरीया यांना बनावट ५०० दराच्या २९१ नोटा देण्यासाठी आलेले रविंद्र हिरामण राऊत रा स्मारक नगर पेठ ता पेठ जि नाशिक व विनोद मोहनभाई पटेल रा चाणक्य बिल्डींग ओमकार बंगल्याजवळ, सुर्यवंशीरोड पंचवटी – नाशिक हे त्यांचेडील इटीऑस कार क्रमांक एमएच ३ सीएच ३७६२ हिचे मध्ये आले असता पंचासमक्ष छापा टाकुन त्यांचेकडुन ५०० दराच्या बनावट २९१ नोटा व इटीऑस कार किमंत अंदाजे ४,००००० रु जप्त करण्यात आली असून वरील इसमांनी भारतीय चलनातील ५०० दराच्या बनावट २९१ नोटा व्यवहारात आण्ण्यासाठी कब्जात बाळगल्या व प्रयत्न केला म्हणून पोकों प्रदिप आजगे यांचे फिर्यादीवरुन लासलगाव पोलीस स्टेशनला वरील इसमांविरुध्द भादवि कलम ४८९ क . ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पोउनि रामकृष्ण सोनवणे हे करीत आहे .