लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाटोदा रस्त्यावर रात्रीच्या सुमारास रस्ते अपघात झाला आहे. अज्ञात वाहनाने बुलेटला जबर धडक दिली. या अपघातात बुलेटस्वाराचा मृत्यू झाला आहे तर त्याच्यासोबत असलेला गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लासलगाव येथे पाटोदा रस्त्याने बुलेटस्वार जात होता. त्याचवेळी अज्ञात चारचाकी वाहनाने बुलेटला धडक दिली. या अपघातात सावरगाव येथील १ जण ठार झाला तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, पोलिसांनाही माहिती दिली. जखमीला स्थानिकांच्या मदतीने तातडीने लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मृत झालेल्या बुलेटस्वाराचे नाव सागर पानमळे असे आहे. तो लष्करी जवान असल्याचे सांगण्यात येत आहे. तो सुट्टीवर गावी आला होता. आणि या अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. लासलगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.