नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लासलगाव येथील आरोग्य केंद्रात कार्यरत असलेला आरोग्य सेवक बळीराम दत्तात्रय शेंडगे याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. एका व्यक्तीच्या पत्नीला कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया करायची होती. आरोग्य केंद्रात ही शस्त्रक्रीया व्हावी यासाठी त्या व्यक्तीने चौकशी केली. मात्र, यासाठी १ हजार रुपये द्यावे लागतील, असे शेंडगे याने सांगितले. मात्र, यासाठी कुठलाही खर्च येत नसल्याचे त्या व्यक्तीला माहित होते. अखेर त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)कडे तक्रार दिली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे शेंडगे याने १ हजार रुपयांची लाच स्विकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शेंडगे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. याप्रकरणी तक्रार देण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.
Lasalgaon PHC Bribe Corruption ACB Raid
Nashik Crime