रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे काम कधी पूर्ण करणार? बांधकाम मंत्र्यांनी दिला हा शब्द

by India Darpan
मार्च 17, 2023 | 5:21 am
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी रखडले आहे. याठिकाणी उड्डाणपुलाचे काम देखील पूर्ण झाले आहे. मात्र केवळ भूसंपादनास निधी नसल्याने हे काम रखडले आहे. त्यामुळे लासलगाव बाह्य वळण रस्ता आणि रेल्वे उड्डाणपूल भूसंपादनासाठी प्राधान्याने निधीची तरतूद करण्यात येऊन काम पूर्ण करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात केली. यावर उत्तर देतांना लासलगाव बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनासाठी निधी तरतूद करून रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

तारांकित प्रश्न उपस्थित करतांना छगन भुजबळ म्हणाले की, लासलगाव बाह्य वळण रस्ता आणि रेल्वे क्रॉसिंग ब्रिजसाठी आवश्यक जमिनीचे थेट खरेदी करून भूसंपादन करण्याकरिता येथील शेतकऱ्यांनी आवश्यक संमतीपत्र दिलेले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने थेट खरेदीसाठी दर सुद्धा निश्चित करून दिलेले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ खरेदीखते नोंदवून शेतकऱ्यांना मोबदला अदा करून थेट खरेदीची कार्यवाही करणे आवश्यक आहे. या भूसंपादनासाठी रक्कम रु.३१.५० कोटी निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनाकरिता रु. ३१.५० कोटी निधीची तरतूद करण्यात यावी व रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली. त्यावरील उत्तरात हे काम मार्गी लावण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण दिली.

Lasalgaon Outer Ring Road Work PWD Minister

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष लेखमाला  – मिशन इयत्ता दहावी – अशी करा विज्ञानाची तयारी!! (व्हिडिओ)

Next Post

शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात तब्बल १८ हजाराहून रुग्णांवर मोफत उपचार; लाभ घेण्यासाठी फक्त हे करा

India Darpan

Next Post
Shirdi Hospital

शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात तब्बल १८ हजाराहून रुग्णांवर मोफत उपचार; लाभ घेण्यासाठी फक्त हे करा

ताज्या बातम्या

cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011