लासगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खराब रस्त्यामुळे कांद्याने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी झाल्याची घटना घडली. लासलगाव जवळ असलेल्या पिंपळगाव येथील जाधव वस्तीवरील राहणारे समाधान जाधव हे २५ क्विंटल कांदा घेऊन लासलगाव बाजार समितीत जात होते. त्यावेळेस माईना बाबा ते पिंपळगाव जवळ रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे त्यांचा कांद्याने भरलेला ट्रॅक्टर नाल्यात पलटी झाला. सुदैवाने शेतक-याने प्रसंगावधान राखत उडी मारली मात्र त्यांच्या ट्रॅक्टरचे तसेच कांद्याचे नुकसान झाले.
वर्षभरापूर्वी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोटमगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज कांदा बाजार समितीच्या आवाराजवळ शेतकरी संदीप घोडे यांचा कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टर पलटी झाला होता. या अपघातात सुमारे ३० क्विंटल कांदा बाजार समितीच्या आवारातील नाल्यातील पाण्यामध्ये पडून खराब झाला होता. रस्त्यावरील साईड पट्ट्या व्यवस्थित भरलेल्या नसल्याने हा अपघात झाला होता.
lasalgaon onion tractor accident farmer loss
bad road condition nashik district potholes