लासलगाव – सौ. सोनिया सत्यजीत होळकर यांनी आयोजित केलेला ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी सरस्वती शाळा मैदान येथे संपन्न झाला. यावेळी जवळपास ७०० महिलांनी प्रत्यक्ष कार्यक्रमांत सहभाग घेतला. गेम्स व मनोरंजनाचा आनंदही या महिलांना यावेळी लुटला. यावेळी बक्षीस व १० पैठणीचें वितरण करण्यात आले. मोनिका करंदीकर यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केले. तसेच लासलगाव महिला विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित या संस्थेचे अनावरण या कार्यक्रमाप्रसंगी झाले. या संस्थेमार्फत महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच प्रशिक्षण देणे हा उद्देश आहे. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शेफाली भुजबळ, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा वेदिका होळकर, ग्रामपंचायत सदस्य रेवती होळकर, रंजनाताई नानासाहेब पाटील, सौ अमिता ब्रम्हेचा तसेच परिसरातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
महिलांसाठी विविध प्रकारचे खेळ किस्से धमाल मज्जा मनोरंजन तसेच संगीत खुर्ची तसेच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खेळ मांडला पैठणीचा मध्ये मानकरी ठरलेल्या सर्व महिलांची अभिनंदन करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येत होती. महिलांसाठी विविध प्रकारचे खेळ किस्से धमाल मज्जा मनोरंजन तसेच संगीत खुर्ची तसेच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.








