शेतकरी विकासला सात जागा तर नम्रता सहकार पॅनलला ६ जागा
लासलगाव – निफाड तालुक्यातील लक्षवेधी ठरलेल्या पाचोरे बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच उत्तमराव नागरे यांच्या शेतकरी विकास पॅनलचे सत्ता काबीज केली आहे. शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार सर्वसाधारण गटातून कांतीलाल भागुजी आंधळे, विनायक जयराम उगलमुगले, सूर्यभान दत्तात्रय नागरे तर स्त्री राखीव गटातून सौ पुंजाबाई रमेश आंधळे तर सर्वात लक्षवेधी ठरलेली भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून शरद माधव नागरे हे विजयी झाले. इतर मागास प्रवर्गातून भास्कर देवराम जगताप हे विजयी झाले. तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून शरद बजरंग बोराडे हे विजयी झाले. तसेच नम्रता सहकार पॅनलचे सर्वसाधारण गटातून माणिक लक्ष्मण नागरे, विलास नामदेव आंधळे, नथुजी भिकाजी नागरे, पुंडलिक किसन नागरे, परसराम नारायण नागरे, हे विजय झाले तर स्त्री राखीव गटातून जनाबाई रमेश सानप या विजयी झाल्या.