लासलगाव – रमजान ईद अक्षय तृतीया हे सण यशस्वीपणे पार पडावे यासाठी लासलगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी लासलगाव शहरात रूट मार्च काढून नागरिकांना यानिमित्ताने सुरक्षिततेची हमी दिली. लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान पोलिसांनी रूट मार्च काढला. लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील गावांमधील सर्वसामान्य नागरिकानी घाबरून न जाता सण आनंदी वातावरणात साजरा करावा कोणत्याही व्यक्तीकडून कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी पोलिसांच्या वतीने करण्यात आले.
लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ कोठूले यांचेसह पोलीस कर्मचारी या संचलनलयात सहभागी झाले होते.