लासलगाव – लासलगाव बाह्य वळण रस्त्याच्या कामाला गती देण्याच्या पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी यांच्या प्रत्यक्ष पाहणी नंतरही भू संपादन थेट खरेदी दराचा मोबदला मान्य नसल्याने रखडलेले काम गतीने होण्यासाठी आता शासनाने लासलगाव बाह्य वळण रस्त्याच्या नवीन सिमंकानाची प्रक्रिया भूसंपादन आणि सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांचे समनव्याने सुरू केल्याची माहिती निफाड प्रांत डॉ.अर्चना पठारे यांनी दिली. तसेच एक महिन्यात प्रक्रिया पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी डी गंगाथरण यांचे आदेश दिले असून नवीन सिमकांन आणि खरेदी आणि प्रत्यक्षात काम सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे असेही प्रांत डॉ अर्चना पठारे यांनी सांगितले
जिल्हाधिकारी डी गंगाथरण यांनी २७ मार्च रोजी या ठिकाणी भेट देऊन जमिनी सिमंकन झालेल्या शेतकरी वर्गाशी चर्चा केली. परंतु थेट खरेदी दराचा मोबदला मान्य नाही असे सांगितले त्यामुळे उड्डाण पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी आता प्रशासनाला आता नव्याने सिमांकान करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वर्गाने सुरू केले असून त्यामुळे आता उड्डाण पुला नंतर जाणारा रस्ता मार्ग कसा बदलणार हे महत्वाचे ठरणार आहे. लासलगाव शहराच्या बाहेरून जात असलेल्या बाह्य वळण रस्त्याचे व उड्डाणपूलाचे कामास अधिक गती देऊन तातडीने काम पूर्ण करण्यात यावे असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कामास भेट दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.
पालकमंत्री छगन भुजबळ यांना लासलगाव ग्रामपंचायतचे सरपंच जयदत्त होळकर, प्रांत अधिकारी डॉ.अर्चना पठारे, उपविभागीय अभियंता गोसावी, अभियंता गणेश चौधरी यां नी माहिती दिली होती. नाशिक जिल्हाचा पदभार स्वीकारलेले जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी लासलगाव येथे भेट देऊन लासलगाव बाह्य वळण रस्ता व उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी केली. लासलगाव येथे सुरु असलेले रेल्वे उड्डाणपूल व बाह्य वळण रस्त्याचे काम खुपचं धीम्या गतीने सुरू आहे. तसेच बाह्य वळण रस्ता बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने याबाबत शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यात ना. भुजबळांकडे कैफियत मांडली होती. सदर प्रसंगी ना.भुजबळांकडून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना याकामी लक्ष घालण्याचे निर्देश देण्यात आले होते.
ना.भूजबळांच्या निर्देशान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी निफाडच्या प्रांताधिकारी डॉ अर्चना पठारे,तहसीलदार शरद घोरपडे सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता अर्जुन गोसावी,शाखा अभियंता गणेश चौधरी यांच्या समवेत लासलगाव येथे भेट देऊन संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली.व अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.त्यावेळी लासलगाव व विंचूर येथील शेतकऱ्यांच्या वतीने थेट खरेदी दर मान्य नाही अशी भूमिका घेतली आहे.