हितेश देसाई
लासलगाव – लासलगाव येथील शिक्षक अशोक घोडे यांचे कनिष्ठ चिरंजीव विशाल घोडे याने एकापाठोपाठ विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. एक एक शिखर पादाक्रांत करत त्याने एमपीएससी परीक्षेत जलसंपदा विभागात श्रेणी १ (क्लास १) अभियंता पदी विराजमान होण्याचा बहुमान मिळविला आहे. सध्या तो औरंगाबाद विभागातून अहमदनगर येथे जलसंपदा विभागात क्लास २ पदावर कार्यरत आहे. या यशाबद्दल शिक्षण विभागातून तसेच मित्र परिवार ,नातेवाईक यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.