लासलगाव – मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून ग्रामीण भागातील बेरोजगाराना स्वयंरोजगार मिळण्यासाठी ३५ टक्के सबसिडी योजनेअंतर्गत लासलगाव येथील तीन लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या लाभार्थ्यांना मालवाहतूक टेम्पोच्या चाव्या देताना जयदत्त होळकर सरपंच ग्रामपंचायत लासलगाव तथा संचालक कृ.उ.बा.स.मुंबई भुजबळ साहेबांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, सौ. वेदिकाताई होळकर, अध्यक्ष.महिला दक्षता समिती याच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्यासोबत अफजलभाई शेख उपसरपंच, चंद्रशेखर होळकर, काँग्रेसचे गुणवंतराव होळकर, रामनाथ शेजवळ, संतोष ब्रम्हेचा,योगेश पाटील, खेडलेचे सरपंच विजू मामा सदाफळ, ललित दरेकर, विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, ब्राह्मणगावचे सरपंच मंगेश गवळी, पिंटू शिकलकर ,हर्षद शेख, लाभार्थी सतीश अहिरे, श्याम नेटारे, केदारनाथ खलसे, ग्रामपंचायत लासलगाव कर्मचारी वृंद उपस्थित होते.