लासलगाव – दि लासलगांव मर्चन्टस को-ऑफ बँकेस सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात २ कोटी ३९ लाखांचा ढोबळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष श्री अशोकराव गवळी, उपाध्यक्ष श्री राजेंद्र घोलप व जेष्ठ संचालक सी.ए अजय ब्रम्हेचा यांनी दिली. बँकेने बँकेच्या स्थैर्य वृध्दीच्या दृष्टीने भरघोष तरतुदी केलेल्या असुन निव्वळ नफा रु.१ कोटी ६२ लाख इतका झालेला आहे.
या वर्ष अखेरीस बँकेचे स्वनिधी १२ कोटी ४४ लाख असुन ठेवी रु. १४७ कोटी ६२ लाख आहेत कर्जवाटप ५७ कोटी २७ लाख केलेले असुन सुरक्षित गुंतवणुक रु.७९ कोटी १७ लाख केलेली आहे. बँकेचे नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र असुन विशेषत: ग्रामिण भागात कार्यरत असल्याने ग्राहक शेती क्षेत्राशी निघडीत आहेत. त्यामुळे नैसगिक आपत्ती व कोरोणाचा प्रादुर्भाव या पार्श्वभुमीवर बँकेस कर्जवसुलीस अतिशय प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागला. तथापी सौजन्य व सहकार्याच्या वसुलीच्या माध्यमातुन समाधानकारक वसुली करून एनपीओ ६.२६% इतके राखण्यात यश आलेले आहे. कर्मचाऱ्यांच्या अथक मेहनतीतुन हे सहज साध्य झाले असे बँकेचे अध्यक्ष यांनी सांगितले. बँकेच्या संचालक मंडळाने सामाजिक बांधीलकीतुन शहराच्या विकासासाठी काही भरीव कार्य करणेचा मानस आहे.
या प्रसंगी बँकेचे संचालक श्री अजय ब्रम्हेचा, श्री संतोष पलोड, श्री संजय कासट, श्री डी. के जगताप, श्री सचिन शिंदे, श्री सचिन मालपाणी, श्री ओमप्रकाश राका, श्री हर्षद पानगव्हाणे, श्री पारसमल ब्रम्हेचा, श्री प्रविण कदम, श्री सोमनाथ शिरसाठ, श्री किसनराव दराडे, सौ संगिताताई पाटील, सौ अर्चना पानगव्हाणे व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जाधव आदी उपस्थित