लासलगाव – येथील श्री महावीर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी येथील निलेश पटणी ,उपाध्यक्षपदी सुमित धाडीवाल,स्वराज भंडारी ,कार्याध्यक्षपदी सागर रेदासनी, खजिनदार पदी आदर्श चोरडिया,तेजस दगडे, तर सेक्रेटरी पदी निखिल छाजेड यांची निवड करण्यात आली आहे. कोरोना नियमांचे निर्बंध शिथिल झाल्याने यंदा लासलगाव शहरात सकल जैन समाजातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जाणार आहे.भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
लासलगाव येथे सकल जैन समाजाच्या वतीने उत्सव समिती बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीचे अध्यक्ष पदी नितीन जैन यांनी भूषविले तर सूत्र संचालन मनोज जैन यांनी केले. यावेळी डॉ.विजय बागरेचा, संतोष ब्रम्हेचा, डॉ प्रवीण डुंगरवाल, सुरेश नाहटा, हेमंत राका, मनोज शिंगी, प्रमोद बाकलीवाल, पिंटू कांकरिया,नितीन नाहटा,विनोद ताथेड,जितेंद्र दगड़े,दर्शन संकलेचा,भाग्येश जांगडा,अक्षय आबड,आकाश बागमार,कल्पेश धाडीवाल,वरून दगडे,नमित धाडीवाल,यश राका,तुषार बोरा,दर्शीत नाहटा,श्रेयान्स बोथरा यांच्यासह जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.