हितेश देसाई, लासलगांव
लासलगाव – यंदा प्रथमच मराठी नववर्षाच्या प्रारंभदिनी गुढी पाडव्याला मराठ मोळ वातावरणात पारंपरिक पद्धतीने आकर्षक रंग संगतीच्या रांगोळ्या आणि नऊवारी साडी परिधान करत सहभागी झालेल्या महिला तसेच भगवे झेंडे हाती घेत पारंपरिक वाद्यवृंदाच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई अन् आलेल्या रांगोळ्यांनी अवघ्या लासलगावकरांनी मनमुराद आनंद लुटला.
शोभायात्रेत श्रीराम मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अशोक नाना होळकर , सरपंच जयदत्त होळकर , गुणवंत होळकर , जगदीश होळकर , संतोष ब्रह्मचा , डॉ . कैलास पाटील , विष्णुपंत निकम , डॉ . युवराज पाटील , अनंता सावंत , मयूर झांबरे , संजय बिरार , डॉ . श्रीनिवास दायमा , डॉ . विकास चांदर , संदीप उगले , संदीप होळकर , सूरज मालपाणी , अशोक डागा , संजय डागा , अॅड . केशव शिंदे , ज्ञानेश्वर इंगळे , प्रीतम पवार , वेदिका होळकर , मनीषा आवारे , मनीषा होळकर , संगीता होळकर , रेवती होळकर , लोकनेते सायंकाळी सहा वाजता श्रीराम मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. प्रथमच ही शोभायात्रा होत असल्याने एका नवीन परंपरेची मुहूर्तमेढ श्री राम मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अशोक नाना होळकर आणि लासलगाव चे उपक्रमशील सरपंच जयदत्त होळकर यांनी सुरू केली आहे. लासलगाव येथे मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणात न्हवून संपन्न झालेल्या शोभायात्रेचे जोरदार स्वागत झाले. श्रीराम मंदिर ट्रस्टतर्फे रामनवमीलाही शोभायात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष अशोक नाना होळकर यांनी दिली.
लाठीकाठी प्रात्यक्षिके
ठिकठिकाणी रस्त्यांवर काढण्यात गजरात मिरवणुकीत लहान मुलांसह लेझीमधारी विद्यार्थी – विद्यार्थिनी , लाठीकाठी प्रात्यक्षिके सादर करणारे वेळापूर येथील चिमुकले , नऊवारी साडी परिधान करत सहभागी झालेल्या महिला तसेच भगवे झेंडे हाती घेत पारंपरिक वाद्यवृंदाच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई अन् आलेल्या रांगोळ्यांनी अवघ्या लासलगावकरांचे लक्ष वेधले . निमित्त होते ते शहरात गुढीपाडव्याचे औचित्य साधत काढलेल्या भव्य शोभायात्रेचे . नागरिक , महिला उपस्थित होत्या . यानिमित्ताने रस्त्यावर भव्य रांगोळी काढण्यात आली होती . शोभायात्रेत . लेझीम पथक , ढोल – ताशांच्या गजरात दत्ताजी पाटील विद्यालय , जिजामाता कन्या विद्यालय तसेच श्री महावीर विद्यालयाचे लेझीम पथक , वेळापूर येथील लाठीकाठी प्रात्यक्षिक करणारे विद्यार्थी , देवगाव तसेच लासलगाव येथील भजनी मंडळ यामध्ये सहभागी झाले होते.