लासलगाव – कोरोना आजाराचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व ऑक्सिजन मिळविण्यासाठी अनेकांना करावी लागत असलेली धावपळ लक्षात घेता वाढदिवसाचा खर्च टाळून शहरातील सामाजिक कार्यकर्ते ओम चोथानी
यांनी दहा लिटर क्षमतेचे दोन ऑक्सिजन मशीन लासलगावकरांच्या सेवेत दाखल केले आहे.
वाढदिवस म्हटला की खर्चाची उधळपट्टी करून तो साजरा करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. मात्र सध्या कोरोनाच्या काळात अनेक लोक सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचा कार्यक्रम टाळत अनेक आरोग्य उपयोगी साहित्य दान करून आपला वाढदिवस साजरा करत असतात. लासलगाव शहरातील ओम चोथानी व त्यांची मित्र कंपनी देखील कोरोना सुरू झाल्यापासून लासलगाव व परिसरातील नागरिकांच्या मदतीसाठी दररोज धावून जात आहेत. अनेक रुग्णांना नाशिक येथे रुग्णालयापर्यंत पोहचविणे ,ऑक्सिजन सुविधा पुरविणे, इंजेक्शन उपलब्ध करून देणे, अनेक गोरगरीब नागरिकांना मदत करण्याचे काम त्यांच्या मित्र मंडळाकडून सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
ओम चोथाणी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दोन ऑक्सिजन मशीन लासलगावकर यांच्या सेवेत दाखल केले आहे. या मशीनचे लोकार्पण नुकतेच लासलगावचे सहा. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या हस्ते पोलीस कार्यालयाच्या आवारात करण्यात आले.यावेळी लासलगाव डॉक्टर असोशियन चे माजी अध्यक्ष डाॅ. विलास कांगणे, प्रतिक चोथानी, मयुर बोरा, विशाल पालवे, सुरज नाईक, सागर चोथानी, अभिजीत जाधव, व्यंकटेश दायमा, सुरज आब्बड, मिरान पठान, नीलेश देसाई,कैलास महाजन , प्रदीप आजगे उपस्थित होते.