लासलगाव – लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या ट्रॅक्टर चोरी झाल्याने झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडत ट्रॅक्टर भरून देण्याची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली.
लासलगाव बाजार समितीत दररोज दीड ते दोन हजार ट्रॅक्टर पिकप वाहनातून कांदा विक्रीला येत असतो अशाच पद्धतिने निफाड तालुक्यातील लासलगाव जवळ असलेल्या टाकळी विंचूर येथील कांदा उत्पादक शेतकरी सुरेश बाबाजी काळे यांनी सोमवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान कांद्याने भरलेला ट्रॅक्टर टारली लिलावासाठी आणला होता. जेवणासाठी घरी गेले असता त्याच दरम्यान अज्ञात चोरट्याने कांद्याने भरलेला ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली. याबाबत बाजार समिती जवळ पाठपुरावा केला असता बाजार समितीत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद तर अस्पष्ट दिसत होते. बाजार समितीकडून कुठलेही योग्य उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र आले. त्यानंतर त्यांनी लासलगाव बाजार समितीचे मुख्य कांदा बाजार आवाराचे प्रवेशद्वार बंद करत प्रवेशद्वारावरच आंदोलन केले. यावेळी त्यांनी या घटनेचा निषेध केला. बाजार समिती प्रशासनाने ट्रॅक्टर न सापडल्यास काहीतरी मदत करू असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याने अर्धा ते पाऊण तास बंद असलेले प्रवेशद्वार खुले झाला. त्यानंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाले.