लासलगाव – संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्नाचा विचार करता भारतीय जनता पार्टीच्या वतीने जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र. कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर आज २६ मार्च रोजी लासलगाव येथील शिवकमल मंगल कार्यालय येथे सकाळी १० वाजता संपन्न झाले.शिबिराचे उद्घाटन भाजपा महिला जिल्हा अध्यक्ष व लासलगाव बाजार समिती सभापती सौ. सुवर्णाताई जगताप यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कांदा व्यापारी ओमप्रकाश उर्फ गोटू शेठ राका हे होते. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य डि. के. नाना जगताप, डॉ विजय बागरेचा, डॉ सुबोध पटणी, एपीआय राहुल वाघ, डॉ असोसिएशनचे अध्यक्ष डॉ श्रीकांत आवारे,भाजपा जैन प्रकोष्ठचे जिल्हा अध्यक्ष नाशिक परेश शहा, नामको चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. देव, भाजपा शहराध्यक्ष योगेश पाटील ,नामको बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश दायमा ,संतोष शेठ पलोड, राजुशेठ राणा ,कैलास सोनवणे आदी उपस्थितीत होते.
हे शिबिर स्वर्गीय झुंबरलाल चोपडा यांचे स्मृती प्रित्यर्थ मनीषजी चोपडा व सभापती सुवर्णाताई जगताप जिल्हा परिषद सदस्य डि. के. नाना जगताप यांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आले. भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे उद्घाटन लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती तथा भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. सुवर्णाताई जगताप यांचच्या हस्ते करण्यात आले . यावेळी सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, महिलांनी आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी तसेच भावी काळात आरोग्य संबंधी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन जास्तीत जास्त महिलांनी या शिबीराचा लाभ घेतला पाहिजे. शहरात जाऊन मोठ्या खर्चिक तपासण्या झेपत नाहीत त्या तपासणी इथे मोफत होत आहेत अशा सुविधा जर लासलगाव सारख्या ठिकाणी उपलब्ध होत असतील तर नक्कीच लाभ घेतला पाहिजे. भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत विमा योजनेत कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा ही समावेश करण्यात आला आहे. या शिबीराचा लाभ गरजू कामगार वर्ग, तळागाळातील सर्व समाज घटकातील महिलांनी भविष्याच्या दृष्टिकोनातून महिलांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी नामको बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश शेठ दायमा यांनी आपल्या मनोगतात कार्यक्रम आयोजकांना शुभेच्छा देत असे उपक्रम झाले पाहिजेत. समाजोपयोगी कार्यासाठी स्वर्गीय झुंबरलाल जी चोपडा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे चिरंजीव मनीष चोपडा यांनी घेतलेला उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे असे मनोगत व्यक्त केले.
तसेच लासलगाव भाजपा मंडल अध्यक्ष सौ स्मिता ताई कुलकर्णी यांनी असे म्हटले की, सुरुवातीच्या काळात कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचे निदान झाले तर आर्थिक नुकसान होत नाही रुग्ण लवकर बरा होतो एक निरोगी जीवन देखील ते जगू शकतात साधारणता चाळिशीच्या नंतरच्या प्रत्येक स्त्रीने आपली शारीरिक तपासणी करून घेतली पाहिजे. महिला या तपासणी पासून अलिप्त राहत असल्याने कुटुंब प्रमुख यांनी महिलांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपले पाहिजे जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला पाहिजे कामगार महिला आरोग्यापासून वंचित असलेल्या कामगार महिला यांच्यासाठी हे शिबीर आयोजित केले असून जास्तीत जास्त महिलांनी तपासणी करून घेतली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने हे शिबिर यशस्वी झाल्याचे सार्थक होईल. जिल्हा अध्यक्ष परेश शहा यांनी अद्यावत सुविधांनी परिपूर्ण अशी ही व्हॅन आहे महिला तसेच पुरुषांच्या मधील कर्करोग प्रमाण वाढत असून योग्य उपचार संतुलित सकस आहार व्यायाम व सकारत्मक विचारांनी आपण अश्या दुखण्यावर मात करू शकतो असे सांगितले
यावेळी महिलांच्या समस्या ब्रेस्ट कँसर, सर्वाईकल कँसर,प्रोटेस्ट कॅन्सर,लंग कँसर, ओरल कँसर आदींवर मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी लासलगाव डॉक्टर असोसिएशन ,समस्त जैन बांधव भगिनी तसेच तसेच मनीषजी चोपडा परिवार व भाजपा नाशिक जिल्हा व लासलगाव मंडल यांचे योगदान लाभले यावेळी या शिबिरात १२० लाभार्थींनी सहभाग नोंदविला. यावेळी नामको बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश दायमा, उद्योजक संतोष पलोड ,राजुशेठ राणा ,राजेंद्र चाफेकर , भाजपा महिला अध्यक्ष स्मिता कुलकर्णी ,नंदलाल कोचर ,अमोल बागमार, राजेंद्र पटणी, अभय अबड, निलेश पटणी, ,नीलिमा चोपडा, स्वाती चोपडा निता बागमार जिल्हा चिटणीस ज्योती शिंदे, मंडळ उपाध्यक्ष रूपा केदारे, नंदाताई शर्मा ,शैलजा भावसार, प्रदीप माठा, विद्या माठा, दत्तू लाल शर्मा, नितीन शर्मा ,डॉ सुरेश दरेकर ,डॉ सुजित गुंजाळ ,डॉ राजेंद्र भावसार ,डॉ संगीता सुरसे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती निकम ,अश्विनी बर्डे ,अमिता ब्रम्हेचा आदी उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी लासलगाव डॉक्टर असोसिएशन ,समस्त जैन बांधव भगिनी तसेच तसेच मनीष चोपडा, व चोपडा परिवार व भाजपा नाशिक जिल्हा व लासलगाव मंडल यांचे योगदान लाभले यावेळी या शिबिरात १२० लाभार्थींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश चोरडिया यांनी केले. तर उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे आयोजक मनीष चोपडा यांनी मानले.