लासलगाव – कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कांदा बाजार आवारात कांद्याच्या बाजार भावाची लाली उतरली असून गेल्या आठवड्यातील शनिवारच्या तुलनेत आज लाल कांद्याच्या सर्वसाधारण बाजार भावात ३०० रुपयांची प्रति क्विंटल मागे घसरण झाली आहे तर कांद्याचे बाजार भाव एक हजार रुपयांपर्यंत आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे
देशांतर्गत गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान येथील शिखर तसेच पश्चिम बंगाल येथील सुखसागर या ठिकाणी आणि लाल नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने तसेच राज्यात नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या भागातही नवीन उन्हाळ कांद्याची लाल कांद्याच्या बरोबरीने आवक येत असल्याने याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजार भाव वर झाला आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कांदा बाजार आवारावर शनिवारच्या तुलनेत आज सोमवारी कांद्याच्या सर्वसाधारण बाजारभावात तीनशे रुपयांनी घसरण झाली आहे शनिवारी १ हजार २६७ वाहनातून २२ हजार ४५ क्विंटल कांद्याची आवक लासलगाव बाजार समितीत दाखल झाली कमाल १५५१ रुपये, किमान ५०० रुपये तर सर्वसाधारण १३०० रुपये प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळाला होता तर आज सोमवारी ९०० वाहनातून ३२ हजार ५०० क्विंटल कांद्याची आवक लासलगाव बाजार समितीत दाखल झाली कमाल १३०० रुपये, किमान ४०० रुपये तर सर्वसाधारण १००० रुपये प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळाला आहे.
लासलगाव बाजार समितीत येवला तालुक्यातील पाटोदा येथील कांदा उत्पादक शेतकरी गोरख बोराडे यांनी अंदाजे ७ क्विंटल लाल कांदा विक्रीला आणला होता या कांद्याला सातशे अकरा रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला असून उत्पादन खर्चाचे विचार केले तर तेराशे ते पंधराशे रुपये प्रतिक्विंटल ला येत असल्याने आज रोजी हा कांदा मी तोट्यात विक्री करत असल्याचे सांगत केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे कांद्याला २ हजार ते एकवीसशे रुपये हमी भाव दिला पाहिजे जास्तीत जास्त कांदा परदेशात निर्यातीवर जोर दिला पाहिजे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने करत आहे.