लासलगाव – पिंपळगाव येथे हर्षदा हर्षदा सुयोग काळे सुयोग काळे (वय २०) या विवाहितेचा घोडे वस्तीजवळ विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आला आहे . लासलगाव पोलीस कार्यालयास पिंपळगाव पोलीस पाटील भरत फड यांनी खबर दिली की, आज. गुरुवारी १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपूर्वी शरद गंगाधर घोडे यांच्या शेतातील विहिरीत हर्षदा सुयोग काळे या विवाहितेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, पोलीस प्रदीप आजगे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून घटनेची नोंद केली असून अधिक तपास लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे करीत आहेत.