रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा, मुस्लिम बांधवांनी जपला माणुसकीचा धर्म
लासलगाव – गरुजू रुग्णांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर ऑक्सिजन सिलेंडर गौसिया मस्जिद यांच्या वतीने देण्याचा उपक्रम अनुकरणीय आहे अहे प्रतिपादन लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी केले.
रमजान ईद सणाचे अगोदर मुस्लिम समाजाच्या वतीने ऑक्सिजन सिलेंडरचे लोकार्पण लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या हस्ते अॉक्सिजन सिलेंडर्स लासलगाव येथील गौसिया मस्जिद मुस्लिम पंच कमिटीचे मोलाना महेमूद आलम,मिरान पठाण,सोनू शेख,अझर शेख,डॉ नजीर शेख,राजू शेख,जमशीर पठाण,जाकीर शेख,अनिस शेख,इबू शेख,मुन्ना काद्री,इम्रान शेख,इम्रान पठाण,बबलू शेख,सिराज शेख,भूषण लोढा,किरण मोरे वसीम शेख,हुसेन शेख यांचे उपस्थितीत करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून लासलगाव सह निफाड तालुक्यात कोरोना संसर्गामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे.राज्यासह नाशिक जिल्ह्यात ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणात कमतरता असतानाच लासलगाव सह निफाड तालुक्यातील रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळावे यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर लासलगाव रेल्वे स्टेशन येथील गौसिया मस्जिद यांच्या विद्यमाने एक हात माणुसकीचा व नागरिकांची गरज ओळखून निफाड तालक्याती गरुजू रुग्णांसाठी”ना नफा ना तोटा” या तत्वावर ऑक्सिजन सिलेंडर देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे
लासलगाव सह निफाड तालुक्यातील रुग्णांना वेळेवर अॉक्सिजन उपलब्ध होत नसल्याने या रुग्णांना अडचणीस सामोरे जावे लागत आहे.अशा कठीण परिस्थितीत येथील गौसिया मस्जिद यांच्या वतीने लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या हस्ते अॉक्सिजन सिलेंडर गरजू रुग्णांना देण्यात आले.या वेळी सामाजिक कार्यकर्ते मिरान पठाण यांनी सांगितले की ज्या रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडरची गरज असेल त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णांचे रिपोर्ट्स व आधारकार्ड आणने गरजेचे आहे व गरज संपल्या नंतर ऑक्सिजन सिलेंडर लवकरात लवकर परत द्यावे जेणेकरून ते सिलेंडर आपणास पुढील रुग्णांना देण्याचे सोईस्कर ठरेल.या अॉक्सिजन सिलेंडरचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे अवाहन गौसिया मस्जिद मुस्लिम पंच कमिटी तर्फे नागरिकांना करण्यात आले. यावेळी मोलाना महेमूद आलम,मिरान पठाण,सोनू शेख,अझर शेख,डॉ नजीर शेख,राजू शेख,जमशीर पठाण,जाकीर शेख,अनिस शेख,इबू शेख,मुन्ना काद्री,इम्रान शेख,इम्रान पठाण,बबलू शेख,सिराज शेख,भूषण लोढा,किरण मोरे वसीम शेख,हुसेन शेख आदी उपस्थित होते
नागरीकांना आवाहन…
ज्या गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर पाहिजे असल्यास त्यांनी उपसरपंच अफजल शेख 9822319855,मिरान पठाण 9730011625,समीर पठाण 9970157993,अझर शेख,9158580786,जाकीर शेख 9922259060,इम्रान काद्री 7020132123,इम्रान पठाण 9850607286,इम्रान शेख 9049911250 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे