लासलगाव – प्रथमच कोरोनामुळे रक्ताची गरज लक्षात घेऊनआज प्रजासत्ताक दिनी लासलगाव पोलीस स्टेशन येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात आज १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे अशी माहिती लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली. उपस्थित रक्तदाते यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ,पलोस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ कोठूले, कैलास महाजन, प्रदीप आजगे, योगेश शिंदे यांचे पोलीस कर्मचारी यांनी स्वागत केले. जनकल्याण रक्त पेढीचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसभर शिबिरात काम केले.
लासलगाव पोलीस स्टेशनच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले याप्रसंगी लासलगावचे जयदत्त काका होळकर लासलगवचे.पो.नि. राहुल वाघ व उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे उपसरपंच अफजल भाई शेख ,गुणवंत होळकर यांचे हस्ते रकतदाते यांना प्रमाणपत्र देण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील रामनाथ शेजवळ, मधुकर गावडे मिराणभाई पठाण ,पिंटू भाऊ शिकलकर, सतीश पवार सोनू शेजवळ, गणेश इंगळे, वाल्मीक गायकर ,संजय जाधव ,किशोर गोसावी, होळकर ,विपुल शेजवळ व आदी मान्यवर सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते .