लासलगाव – प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लासलगाव बस डेपो तर्फे भीक मागो आंदोलन करण्यात आले. एसटी महामंडळचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेले अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचा-यांचा संप सुरु आहे. पण, या आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लासलगाव बस डेपो कर्मचा-यांनी भीक मागो आंदोलन केले. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कर्मचारी असेच वेगवेगळे आंदोलन करत आहे. शासनाने पगारवाढ केली असली तरी कर्मचा-यांची मुळ मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे या मागणीसाठी कर्मचारी अनोखे आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधत आहे. पण, य़ा आंदोलनाकडे अजूनही सरकार सकारात्मकपणे बघत नाही. त्यामुळे हे आंदोलन प्रदिर्घ कालावधीपासून सुरुच आहे. ते लवकर मिटावे व पुन्हा एसटीची बस सेवा सुरु व्हावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.